Corona infected two children in kuduchi belgum
Corona infected two children in kuduchi belgum

धक्कादायक : बेळगाव जिल्ह्यातील कुडचीत दोन बालकांना झाला कोरोना...

Published on

बेळगाव - गुलबर्गा जिल्ह्यात चार महिन्याच्या बाळाला आईपासून कोरोना संसर्ग झाल्याची घटना ताजी असताना रायबाग तालुका कुडचीत आणखी दोघा बालकांना कोरोना व्हायरची लागण झाल्याचे आज (ता.24) निदान झाले. गेल्या आठवड्यात मुलांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेला पाठविले होते. आज (ता.24) अहवाल आला. त्यामध्ये दहा वर्षाची मुलगी, पंधरा वर्षाच्या मुलामध्ये कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 45 झाली आहे. कुडचीत आतापर्यंत सर्वाधिक 19 जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राज्यात 24 तासात 18 नव्या रुग्णांची भर पडली. पैकी दोघे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. कुडची (ता.रायबाग) येथील रहिवाशी असून, त्यापैकी एका बालिकेचे वय दहा आहे. तर, दुसऱ्या मुलाचे वय 15 आहे. त्यामुळे कुडचीत आतापर्यंत 19 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी एका महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, जिल्ह्यामध्ये 45 जणांना आतापर्यंत कोरोना संसर्गची नोंद आहे. दहा वर्षाची बालिका व पंधरा वर्षाचा मुलगा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत तिघांना घरी सोडले असून, हिरेबागेवाडी येथील वृध्दा कोरोनाचा पहिला बळी ठरली आहे.

गुलबर्ग्यात 35 वर्षिय महिलेला कोरोना बुधवारी (ता. 22) लागण झाल्याचा अहवाल आला. त्यासोबत तिच्यापासून चार महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ आज बेळगाव जिल्ह्यांत शालेय विद्यार्थ्यांत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना कक्षात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यात 24 तासात 18 रुग्ण वाढल्यामुळे एकूण संख्या 463 झाली आहे. तसेच 24 तासात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृताचा आकडा 18 झाला आहे.
 

"जिल्ह्यात आज दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही बालके आहेत. कोरोना व्हायरची लागण झालेली मुले व त्यांच्या कुटुंबियांना अगोदरच क्वारंटाईन केले आहे. आतापर्यंत एका कुटुंबातील व त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. त्यासाठी दक्षता म्हणून क्वारंटाईन करून निगा राखली जाते आहे.'' - एस. बी. बोम्मनहळ्ळी - जिल्हाधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com